वरंगलचे काकतीय – एक कोहिनूर

P.C - Kavita Kulkarni मी पहिल्यांदा हैदराबादला आलो तेव्हा सिकंदराबाद जवळ एका हॉटेलमधे राहिलो होतो. हॉटेलकडे जाताना मला बेगमपेठला भव्यदिव्य असे ITC Kakatiya हॉटेल दिसले. मला ITC हॉटेलविषयी कल्पना होती, परंतु हैदराबादच्या ITC हॉटेलला ‘काकतीया’ असे नाव का दिले? असा प्रश्न मला पडला.  काकतीय नक्की काय आहे? व्यक्ती आहे की विभाग आहे? व्यक्ती असेल तर  … Continue reading वरंगलचे काकतीय – एक कोहिनूर

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२४

P. C, Wikipedia एक नवीन वर्ष येते आणि एक वर्ष जाते एक सरळ साधी प्रक्रिया, त्याच बरोबर येणारे हे वर्ष खूप काही देऊन गेले, धडे, शिकवण वगैरे सुद्धा दरवर्षी येत असते. तसे पाहिले तर ज्यांचे लग्न झाले त्यांना बायको किंवा नवरा मिळतो आणि मुलबाळं झाली तर मुलं मिळतात त्याशिवाय वर्ष मौलिक अर्थाने फार काही देत … Continue reading नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२४

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा २०२३

नमस्कार सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!, दिवाळी आनंदमयी, मंगलमयी जावो हिच सदिच्छा!! नुकताच डिपफेक किंवा प्रचंडखोटं, मोठखोटं किंवा अगदी शब्दशः अर्थ काढायचा झाला तर खोलखोटं या विडियोवरुन खूप वाद झाला. त्यावरुन मला रोवेन अॅटकिंनसनचा (Mr. Bean) चित्रपट Johny English Strikes Again मधला एक प्रसंग आठवला. तो चित्रपट जेम्स बाँड चित्रपटांची पॅरोडी आहे. त्यामुळे अर्थात मुख्य … Continue reading दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा २०२३

काय ग राणी

कविता लिहिणे काही मला जमत नाही. खूप प्रयत्न करुनही कविता लिहिता येत नाही. शेवटी कविता लिहिता येत नाही त्यासाठीच कविता लिहिली. काय ग राणी, किती ग त्रास देशील आणि अग किती भटकलो मी दऱ्या खोऱ्यातग्रीष्माच्या चटक्यात आणि पावसाच्या तडाख्यातसोसले बरं टाकीचे घावबांधले अश्रूंचे इमलेदिसली नाही तुझी पावलेअग किती लपशील आणि अग ती बघ सुरवंटालाही पंख … Continue reading काय ग राणी

मी पाऊस आणि कविता

काही गोष्टी बदलत नाही म्हणतात ना ते खरे आहे. आता हेच बघा उन्हामुळे तापून पाण्याचे बाष्प होते. त्याचे ढगात रुपांतर होते. कुठेतरी कसातरी कमी दाबाचा पट्टा वगैरे तयार होतो आणि मग पाऊस पडतो. हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यासाठी कोण कुठे काय खणतो ते माहित नाही पण तो तयार होत असतो. थोडक्यात काय पाऊस पडणे … Continue reading मी पाऊस आणि कविता

मी वसंतराव – गाण्यापलीकडला अनुभव

खूप दिवसांनी का असेना पण मी शेवटी 'मी वसंतराव' हा चित्रपट बघितला. थियटेरमधे बघणे झाले नाही पण Jio Cinema वर बघायला सुद्धा उशीरच झाला. उशीरा सिनेमा बघून त्यावर काही लिहिण्यात हा फायदा असतो की बऱ्याच मंडळींनी सिनेमा बघितला असतो त्यामुळे कथानक माहिती असते. अशा वेळेला काही लिहिणे म्हणजे चित्रपट बघितल्यानंतर दोन व्यक्तीनी केलेल्या गप्पा असतात … Continue reading मी वसंतराव – गाण्यापलीकडला अनुभव

आजीस पत्र

||श्री|| ता. ४ जून २०२२ ति. स्व. कमळा आजीसशिर. साष्टांग नमस्कार विनंती विशेष पत्र लिहिण्याचे कारण की …… काही नाही वं तुझी आठवण आली. तू म्हणशील आबा माझी आठवण यायला का झालं. असा विसरन का, तू माझ्या मायची माय होती. तेंव्हा आली आठवण.काय आहे ना कमळाबाई (मला हेच जास्त आवडते) पत्र लिहायचे म्हटले की तूच … Continue reading आजीस पत्र

एकदाच काय ते बोलून टाकू

होळीच्या पूर्वसंध्येवर एक हलकीफुलकी कविता लिहिली होती. खास पुणेकर प्रेमींसाठी, यात बरेचसे पुण्याचे संदर्भ आहेत. या कवितेचा विडियो इथे बघा. एकदाच काय ते बोलून टाकू खूप झाले एफसीचे कट्टे आणि वैशालीचे दोसेते कॉफीत झुरन आणि मनात बोलणंगुडलक मधे बसून स्वतःलाच बॅड लक म्हणणंसारा राग मग पार्किंग नाही म्हणून काढणंसार आता संपवून टाकूतू हिंजवाडीला येते की … Continue reading एकदाच काय ते बोलून टाकू

व्याजासहित

त्या पडक्या वाड्यास काहीतरी सांगायचे होतेअंगणात पेरलेल्या गव्हास अंकुर फुटायचे होते वड्याळकरांचा वाडा अशा नावाने जरी तो परिसर ओळखला जात असला तरी आता एक पडकी इमारत सोडली तर त्या परिसराशी वड्याळकरांचा काही संबंध उरला नव्हता. वड्याळकरांची पोर आता विदेशात राहत होती त्यांना दोन बिऱ्हाडाकडून मिळणाऱ्या महिना तीस रुपये भाड्याशी देणे घेणे नव्हती. समोरची जागा विकली … Continue reading व्याजासहित

तुला कसे बोलावू

मी माझ्या एका मित्राला खूप वर्षांनंतर भेटत होतो. वर्धा सोडल्यानंतर मी दक्षिण भारतात स्थिरावलो आणि तो पुण्यात स्थिरावला. मनमुराद गप्पा सुरू होत्या. मित्राशी बोलताना जाणवत होते की पुण्याबाहेरील मंडळी पुण्यात राहायला लागल्यानंतर ओढूनताणून स्वतःच्या भाषेवर शुद्ध भाषेच्या नावाने जे अत्याचार करतात, तसेच काहीतरी माझ्या मित्राच्या मराठीचे झाले होते. मंडळी पुण्यात गेल्यावर स्वतःच्या भाषेचे असे भजे का … Continue reading तुला कसे बोलावू