एक फसलेल नाटक- आणखीन एक

WhatsApp Image 2019-03-24 at 3.50.23 PM

(या एकांकिकेत साराच गोंधळ अपेक्षित आहे. वेषभूषा, नेपथ्थ, संगीत सारा गोंधळ . गोष्ट आणि पात्रे यात गोंधळ तर आहेच. त्यातला आणखीन एक प्रवेश. त्याच कलाकारांची चर्चा चालली आहे. एकूण आठ प्रवेश आहेत. तीन प्रवेश इथे दिले आहेत. एक फसलेले नाटक-१, एक फसलेले नाटक-प्रवेश)

मुलगी हे काय रे. संपव, काय चाललय? कशी तुझी पात्रे आहेत ना त्यांना धड प्रेमात पडता येत, ना धड संसार करता येत आता तर धड घटस्फोट सुद्धा घेता येत नाही. आता मला सहन होत नाही.
मुलगा आता शेवटल समाजाच्या प्रतिक्रिया. लग्नाची गोष्ट आहे ही, सार कस साग्रसंगीत व्हायला हव.
मुलगी कोण कुठला तुझ्या कथेतला सामान्यहून सामान्य नायक आणि त्याची ती फालतू नायिका त्यांनी घटस्फोट घेतला तर समाज कशाला प्रतिक्रिया देइल.
मुलगा निदान त्यांच्या आईवडीलांच्या तरी
मुलगी मुलीच्या वडीलांना खपवले ना मघाशी.
मुलगा मुलाचे आईवडील, गावात आहेत. हल्ली नवीन फॅड आलय ना रिटायर्ड झाल्यावर गावात स्थायिक व्हायच. मुळाशी जोडल्या जायच वगैरे. चल मग जाउ या गावी त्यांची प्रतिक्रिया. 
(मुलगा रंगमंचाच्या बाहेर जातो. मुलगी बाहेर जातच असते तर एक मुलगा तुळसी वृंदावन आणून मंचावर ठेवतो. पेटीवाला मै तुलसी तेरे अंगणकी गाणे वाजवतो)
मुलगी (मुलगी बाहेर न जाता मंचावरच थांबते. पेटीवाल्याकडे बघत) अरे काय संबंध. कधीही काहीही वाजवतो, (त्या वृंदावन आणणाऱ्या पोराकडे बघत) काय रे हे तुळसी वृंदावन कशाला आणले.
पोरगा डायरेक्टरन सांगितल गाव वाटल पाहीजे. तुळशी वृंदावन ठेवा.
मुलगी हो ते गावातच राहत नाही. तुला कुठे सापडल इथे शहरात.
पोरगा हे नकली आहे खड्डयाचं. (एक मुलगा नारळाचे झाड आणून ठेवतो)
मुलगी अरे वा नारळाचे झाड पण. येवा अख्खा कोकण आपलाच असा. (कुत्सितपणे)समुद्र नाही आणला?
मुलगा समुद्र घरी राहला. सकाळीच य़ेका डब्ब्यात बंदा समुद्र भरला होता. तो डब्बाच घरी राहीला.
मुलगी तो डब्बा म्हणजे अगस्ती मुनीच जसा. जाउ दे सिन सुरु कर.
(मुलगा एक पंचा गुंडाळून एका हातात आरसा एका हातात खुर्ची घेउन प्रवेश करतो. प्रेक्षकांसमोरच केसांना सफेदी लावतो. हातात एक पेपर घेउन खुर्चीत बसतो. )
मुलगा (मुलीकडे बघत) तू इथे उभी का. आत जा. मुलाची आई आहेस तू स्वयंपाकघातूनच एंट्री असते तुला.
मुलगी कुठे आहे स्वयंपाकघर. आणि ते अहो ऐकलत का स्वयंपाकघरातून म्हटल काय आणि संडासातून काय फरक पडतो. परिणाम तर सारखाच होतो. 
मुलगा जगातले सारे दिग्दर्शक मुलाच्या आईला स्वयंपाकघरातूनच एंट्री घ्यायला सांगतात. केसांना थोडी सफेदी लाव नाहीतर म्हातऱ्यान बाई ठेवल्यासारख वाटेल.

(मुलगी चिडून आत जाते. मुलगा पेपर वाचतो. मुलगी केसांना सफेदी लावीत प्रवेश करते)

मुलगी अहो ऐकलत का?
मुलगा तुझ ऐकण्याखेरीज दुसर कोणत काम आहे मला ?
मुलगी आपल काय ठरल होत. जुनाट विनोद करायचे नाही. नवरा बायकोतला वाद हा पुरातन विनोद आहे. परत सुरु करते. अहो ऐकलत का?
मुलगा काय?
मुलगी तुमच्या मुलाचे फेसबुक स्टेट्स चेक केले का?
मुलगा काय म्हणतो कारटं?
मुलगी Breaking up
मुलगा अरे वा लगेच लाइक करुन टाक. किती लाइक आहेत आतापर्यंत.
मुलगी अहो मुलगा break up घेतोय. गोव्याला नाही चालला तो, लाइक्स मोजायला.
मुलगा लाइक्स मोजायला गोव्याला नाही जावे लागत. इथे बसूनही मोजता येतात. विनोद फालतू असला तरी नया है यह.
मुलगी (चिडून) तुमचा मुलगा घटस्फोट घेतोय.
मुलगा अरे वा आता लग्न कधी करनार. 
मुलगी अहो विनोद कसले करता. घटस्फोट घेतोय म्हणजे लग्न झाले असेलच ना.
मुलगा अग गेली दहा वर्षे ते दोघे एकत्र राहत होते त्यात लग्न कधी केले कसे समजायचे. घटस्फोटच घ्यायचाच होता तर आता कशाला लग्न केले.
मुलगी अहो त्यांच ते असत ना हल्लीच नात्याला लेबल लावायच नाही. त्यांचही असच काहीतरी चालल होत बिना लेबलच. 
मुलगा साधी अंडरवियर सुद्धा ब्रँडचे लेबल नसेल तर विकत घेत नाही ही पोर आणि नात्याला लेबल नको म्हणतात.
मुलगी जाउ द्या तुम्ही तुमच्या भूमिकेत रहा. उगाच तत्वज्ञान सांगू नका.
मुलगा कसा राहू भूमिकेत, असा (तो हृदयविकाराच त्रास झाल्यासारखा करतो)
मुलगी ओव्हर रियक्ट करु नका. मी सांगते कसे बोलायचे ते. हे करुणाकरा का असा वागतोस आमच्याशी. आमच्या पोरांनी असा घटस्फोट घेतला तर आम्ही कुणाकडे बघायच. सूनबाईच नसेल तर कोण आम्हाला घराबाहेर हाकलून देइल. आम्ही आमच्या अब्रूची लक्तर वेशीवर कशी टांगनार. हे विधात्या आम्हा म्हाताऱ्या आईबाबांच्या दुर्देशचे कारण असनारी ती सूनबाई का हिरावून घेतली तू आमच्यापासून. या म्हाताऱ्यांच्या जीवानात नाट्याच कारण असनारी ती सूनबाईच तू काढून घेतली तर असे फक्त पेपर वाचीत कसे जगायचे आम्ही. जगाव की, का जगाव हा एकच सवाल आहे.
मुलगा स्वतःला नटसम्राट समजते. लायकी आहे तुझी. प्रतिक्रिया कशी हवी शांत आणि संयमित. हल्लीचे मायबाप आहोत आपण. शांत असतो. तेंव्हा असा ठोकळ्यासारखा चेहरा करुन बोलता आल पाहिजे, सिरियलचा जमाना आहे. लग्न केल ते आमच्या मनाविरुद्ध आणि आता घटस्फोट घेतोय तोही आमच्या मनाविरुद्ध. लग्न करताना नाही विचारल तर निदान घटस्फोट घेताना तरी या गरीब बापाची परवानगी घ्यायची होती. असो तू तुझे निर्णय घेण्याइतपत मोठा झाला नाही आता. मी काय सांगनार. (तो अस्वस्थपणे इकडे तिकडे बघतो, खाली बसून दिर्घ श्वास घेतो.)
मुलगी तुम्हाला अस्वस्थ वाटते का? मी चहा आणू का? तुम्ही बसा बर शांतपणे अजिबात मनाला लावून घेउ नका मी चहा टाकते.
मुलगा अस्वस्थ वाटले तर चहा. एसिडीटी वाढेल ना.
मुलगी मराठी टिव्ही सिरियलसारख हव काहीही झाल की चहा आणायचा.
मुलगा ते जाउ दे तू त्या फेसबुक स्टेटसचे काय करायचे ठरविले. अँग्री, सॅड, हॅपी की कनफुझड कसला इमोजी टाकनार आहेस तू.
मुलगी मी खूप कनफ्युझड आहे हो. आपल्या मुलांनी आपणहून घटस्फोट घ्यायचे ठरविले तर आईबाबांनी कसे रियक्ट करायचे हे माहीतच नाही अजून. हॅपी असा इमोजी टाकला तर माझा घटस्फोट झाला आणि तुम्हाला कसला आनंद होतोय असे म्हणेल तो. दुःखी टाकला तर त्यात वाईट वाटायसारखे काय एवढे उगीचच तिला भाव देउन डोक्यावर चढवू नका असे म्हणायचा तो. काही कळत नाही.
मुलगा लाइक कर आणि खाली कमेंट कर तुझ्या प्रत्येक निर्णयात तुझ्या सोबत असनारे आईबाबा. मिटवून टाक हे प्रकरण एकदाच. खूप ताणल्या गेल. जास्ती ताणू नको. (असे म्हणतो तो हातातला पेपर फाडतो. आणि अंधार होतो.)

2 thoughts on “एक फसलेल नाटक- आणखीन एक

टिप्पण्या बंद आहेत.