Catch-22: धरल तर चावतं

दुसऱ्या महायुद्धाचा काळ. रोमपासून काही अंतरावर जर्मनी आणि इटली यांच्या सीमेवरील पियानोझा नावाचे बेट, जिथे अमेरिकन सैन्याचा तळ आहे. अमेरिकन सैन्य जर्मन फौजांपासून इटलीचे संरक्षण करण्यासाठी तैनात आहे. गेली काही वर्षे झाली, हे सैनिक त्यांच्या देशापासून दूर याच बेटावर तैनात आहे. अशात एका सैनिकाची तब्येत बिघडली. तो मरायला टेकला. त्याच्या घरच्यांना कळविण्यात आले, पण त्याच्या … Continue reading Catch-22: धरल तर चावतं

सायकल दौरा पूर्वेचा घाट – अंतीम भाग

अराकु डोंगरांच्या मधे वसलेले छोटेस शहर, आंध्र प्रदेशातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ, आंध्र आणि तेलंगाणा भागातले महत्वाचे हिल स्टेशन अराकुची अशी कितीतरी ओळख देता येईल. माझ्या काही मित्रांच्या मते अराकुमधे गर्दी वाढली पण मला तरी अराकु म्हणजे दहा वर्षापूर्वीचे कुर्ग वाटले. विशाखापट्टणमपासून अराकु साधारण १२० किमी दूर आहे. आता एक काचेचे छत असणारी रेल्वे सुद्धा … Continue reading सायकल दौरा पूर्वेचा घाट – अंतीम भाग

सायकल दौरा पूर्वेचा घाट – असा घातला घाट ३

तिसरा दिवस कठीण आहे याची पूर्ण कल्पना होती. तशी मानसिक तयारी दौऱ्याच्या आधीपासूनच झाली होती. दुसऱ्या दिवशीच्या रात्रीच्या जेवणाच्या वेळेला परत एकदा परिक्षा घेण्यात आली तेंव्हा सर्वांचे उत्तर एकच होते. "उद्या सर्वजण चढ चढणार आहेत का? चढ मारेडमल्लीपेक्षाही कठीण आहे.” "प्रयत्न करु या" तिसरा दिवस कठीण असण्याची दोन कारणे होती १. साधारण १५४ किमी अंतर … Continue reading सायकल दौरा पूर्वेचा घाट – असा घातला घाट ३

सायकल दौरा पूर्वेचा घाट – असा घातला घाट २

रंपाचोडावरम मारेडमल्लीला डास असले तरी शरीर थकल्यामुळे मस्त झोप लागली. मारेडमल्लीचे जेवण पण सुंदर होते. दुसऱ्या दिवशी मारेडमल्ली ते नरसीपट्टणम असे १३४ किमीचे अंतर कापायचे होते. मी आजपर्यंत कधीही सलग दोन दिवस शतक पूर्ण केले नव्हते. आजच्या रस्त्यात आदल्यादिवशी सारखे चढ नव्हते. पूर्ण सपाट जरी नाही तरी रस्ता सोपा होता. मारेडमल्लीवरुन आम्ही सकाळी सातला निघालो. … Continue reading सायकल दौरा पूर्वेचा घाट – असा घातला घाट २

पूर्वेचा घाट – असा घातला घाट

आता पहिल्या भागात मी सांगितले हे असे कठीण होते तसे कठीण होते, माझा सराव झाला नाही. यावरुन जर तुम्ही असे ठरविले असेल कि आता हा सांगनार हे अस सारं असलं तरी मी कसा वर चढून गेलो वगैरे. तर असे नाही. I completed but I struggle. वाट लागली याशिवाय दुसरा सौज्वळ वाक्यप्रचार नाही तेंव्हा एकच सरावाला … Continue reading पूर्वेचा घाट – असा घातला घाट

सायकल दौरा पूर्वेचा घाट- का, कुठे, कसा?

का घातला घाट? या प्रश्नाला एकच उत्तर आहे शौक (हाच शब्द अधिक सोज्वळ आहे). खरे सांगायचे तर सायकलिंग हा शौक आहे, छंद आहे. निव्वळ फिट आणि तंदुरुस्त राहायला बरेच स्वस्तातले उपाय उपलब्ध आहे. शौक असल्याशिवाय कुणीही सायकलिंगवर पैसे उधळायला तयार होणार नाही. हा असा एकमेव शौक आहे ज्यावर पैसे उधळले तरी बायको विरोध करीत नाही. … Continue reading सायकल दौरा पूर्वेचा घाट- का, कुठे, कसा?

वैशालीतला उपमा कि सुदाम्याचे पोहे

शनिवारवाडा, सिंहगड, म्हात्रे पूल, बिडकरची मिसळ या प्रमाणेच वैशाली हे पुणेकरांचे एक अत्यंत आदरांचे स्थान आहे. वैशालीतला उपमा खात आणि फर्ग्युसन वर नजर ठेवीत कित्येकांनी तारुण्यात बहार आणली. अशांनी वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे स्वाभाविक आहे पण एका तीन वर्षाच्या मुलाने वैशालीच्या उपम्याचा जाज्वल्य अभिमान दाखविणे जरा जास्तच होते. दादरला माझ्या मैत्रीणीच्या बहिणीचे लग्न होते. मुलाकडली … Continue reading वैशालीतला उपमा कि सुदाम्याचे पोहे

अंधाधुंद

(P.C. जालावरुन) जरा जास्तच दिस झाले आपल काही बोलण झाल नाही. पण आता का करता जी उनच अस तापल होत का काही लिहूशाच वाटत नव्हत. वरुन लगनसराई, टायमच सापडत नव्हता. म्या इचार केला पाउस पडून जाउ दे मंगच बोलू. पाउस बी असा दडी मारुन बसला का बोलाच काम नाही. अख्या मिरग गेला पण येक थेंब … Continue reading अंधाधुंद

एक फसलेल नाटक- आणखीन एक

(या एकांकिकेत साराच गोंधळ अपेक्षित आहे. वेषभूषा, नेपथ्थ, संगीत सारा गोंधळ . गोष्ट आणि पात्रे यात गोंधळ तर आहेच. त्यातला आणखीन एक प्रवेश. त्याच कलाकारांची चर्चा चालली आहे. एकूण आठ प्रवेश आहेत. तीन प्रवेश इथे दिले आहेत. एक फसलेले नाटक-१, एक फसलेले नाटक-प्रवेश) मुलगी हे काय रे. संपव, काय चाललय? कशी तुझी पात्रे आहेत ना … Continue reading एक फसलेल नाटक- आणखीन एक

एक फसलेले नाटक-१

(या एकांकिकेत साराच गोंधळ अपेक्षित आहे. वेषभूषा, नेपथ्थ, संगीत सारा गोंधळ . गोष्ट आणि पात्रे यात गोंधळ तर आहेच. एकूण आठ प्रवेश आहेत. तीन इथे दिले आहेत. एक फसलेल नाटक-आणखीन एक, एक फसलेल नाटक) पात्र परिचय मुलगा आणि मुलगी: दोन साधारणतः सारख्याच वयाचे व्यक्ती. वेषभूषा बदलणे अपेक्षित नाही. (मंगलवाद्यांच्या गजरात पडदा वर जातो तेंव्हा रंगमंचावर … Continue reading एक फसलेले नाटक-१