संपर्क

संपर्क

काही तांत्रिक कारणाने प्रतिसाद लेख प्रसिद्ध झाल्यानंतर चौदा दिवसानंतर बंद करण्यात आलेले आहेत. तुम्हाला काही माहीती हवी असेल तर इमेलद्वारा संपर्क साधू शकता.

इमेल (निरोपाचा पत्ता)

mitrahow@gmail.com

 

आमचे फेसबुक पेज: https://www.facebook.com/mitrahow

twitter: mitraho

mitrahow@gmail.com

मित्रहो कुणासाठी कशासाठी

कंटाळा आला म्हणून काहीतरी टाइप करीत गेलो. सहज सुचलेल, मनाला भावलेल, शब्दात विणलेले. कधी पोट धरुन हसवनारं तर कधी हलकेच गुदगुली करनारं. हळहळू त्याची गोष्ट होत गेली. अशा गोष्टींची साठवण होत गेली. मी माझ्याच गोष्टी किती वाचायच्या किती दिवस वाचायच्या, मीच का? म्हणून मग हा मित्रहोचा प्रपंच मित्रांनी, मित्रांसाठी केलेला प्रपंच म्हणजे मित्रहो. उगाचच मोठी वचने नाही किंवा ब्लॉगला भेट देणारे वाढावे म्हणून उगाचच काही लिहीणे नाही. तर महीन्याला एक काही तरी नक्की लिहायच, जमल्यास दोनदा. मी काही Assembly line लेखक नाही की दिवसाला तीस मिनिटाचे एपिसोड लिहीतोय. लिहून स्वतःचे समाधान आणि वाचकाल आनंद व्हावा हाच मुख्य उद्देष्य. वर्षभर वापरता येइल इतका स्टॉक माझ्या ड्रॉपबॉक्स मधे नक्की आहे, तो संपला कि बघू. सध्या मी एकटाच पण पुढे या आनंदयात्रेत यात्रेकरु भेटले तर त्यांचे स्वागतच आहे. कुणाला वाटले तर त्याने खालील इमेलवर कळवावे. हा प्रपंच अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहचवन्यासाठी आणी त्याला अजून सुंदर बनवण्यासाठी तुम्हा साऱ्यांचे सहकार्य जरुर हवे. तेंव्हा वाचा टिका करा शेअर करा. खरच आवडल्यास लाइक करा.

तशी तीन सदरे, ‘मी, मी आणि मीच’, ‘स्ट्रगलर्स’ आणि ‘मनमोकळ’.

‘मी, मी आणि मीच’ मधले लिखाण म्हणजे थोडेसे स्वानुभवातले पण आत्मचरीत्रपर नाही. मला चांगलेच ठाउक आहे मी काही ‘जेथे कर माझे जुळती’ या प्रकारात मोडत नाही. बर आयुष्यात काही लफडी वगेरे केली असताी तर तेही नाही तेंव्हा चटचटीत, खुमासदार असे काही नाही . सर्वसामान्य चार माणसांसारखे माझे जीवन. आयुष्यात काही करता आले नाही म्हणून इंजीनियरींग केले. मूर्खपणा म्हणतात तो हा इंजीनियरींग करुनही आयुष्यभर कारकूनी केली, टायपींग केली. त्याला भलेही आम्ही माहीती तंत्रज्ञान वगेरे म्हटले असेल.असला मनुष्य आयुष्यात लफडी वगेरे कसा करेल अहो लग्न सुद्धा अरेंज्ड केले. हा जो काही प्रपंच आहे तो जीवनातील विसंगती टिपण्याचा एक तोकडा प्रयत्न. त्यावर केलेेले एक भाष्य. आचार्य अत्रेंनी म्हटले होते विसंगती, व्यंग आणि अतिशयोक्ती हे विनोदाचे अस्त्र आहे. विसंगती शोधायला इतरांच्या जीवनात नाक खुपसायची काय गरज आहे ती स्वतःच्याच जीवनात ठासून भरलेली आहे.  या अशा विसंगतीपूर्ण गोष्टींचाच संग्रह म्हणजे ‘मी, मी आणि मीच ‘.

‘स्ट्रगलर्स’ म्हणजे मुंबइत नोकरी शोधायच्या निमित्त्याने राहणाऱ्या मुलांच्या कथा. शेवटी स्ट्रगल किंवा संघर्ष कधी टॅलेंट दाखविण्यासाठी नसतो तर तो प्रस्थापित संकल्पना किवा रुढींविरुद्ध असतो. स्ट्रगल म्हटला कि मला आजच्या युगातला आघाडीचा कलाकार नवाजउद्दीन सिद्दीकी आठवतो. त्याने त्याचे टॅलेंट दहा वर्षापूर्वीच मुन्नाभाई मधल्या छोट्या भूमिकेत दाखवून दिले. अजूनही त्या छोट्या भूमिकेतले भिरभिरनारे कनफुझ्ड डोळे आठवतात. पण आपल्याला त्याला शोधायला दहा वर्षे लागली.  का तर तो सुंदर नाही, कोण्या मोठ्याचा मुलगा नाही, तो फक्त भुरट्या चोराच्या भूमिकेसाठी आहे. अशा आणि अनेक प्रस्थापित संकल्पेनेविरुद्ध साऱ्यांना सामोरे जावे लागते. त्याचेच वर्णन म्हणजे स्ट्रगलर्स. मी मुंबईला असताना मला किंवा माझ्या मित्रांना आलेल्या अनुभवांना कल्पकेतेची जोड देउन एका सूत्रात बांधण्याचा केलेला प्रयत्न.

‘मनमोकळ’.शब्दासारखेच.

शेवटी बरेचसे लिखाण विनोदी आहे आणि ते तसेच घ्यावे ही विनंती.
या ब्लॉगवरील लिखाण हे एकतर काल्पनिक आहे किंवा काही अनुभवांना कल्पनेची जोड देउन लिहीण्यात आलेले आहे. बाकी साऱ्या योगायोगाच्याच गोष्टी.

तुम्हाला हा प्रपंच आवडेल ही अपेक्षा तेंव्हा  वाचा टिका करा शेअर करा. खरच आवडल्यास लाइक करा.

 

संपर्क

तुम्ही खालील फॉर्म भरुन सुद्धा संपर्क साधू शकता

 

 

 

7 thoughts on “संपर्क

  1. मराठी मध्ये लिहणाऱ्यांची संख्या मुळातच कमी. मराठी ब्लॉग विश्व वाढायचे असेल तर ब्लॉगर्सने जास्तीत जास्त मराठी ब्लॉगला भेटी दिल्या पाहिजेत, कॉमेंट , लाईक केले पाहिजे. आवडेल तेथे फॉलो केले पाहिजे. तर जास्तीत जास्त वाचक आपण मराठी ब्लॉगकडे वळवू शकू. आपणही हा विचार करावा ही विनंती आहे.
    माझ्या ब्लॉगला आपण भेट देऊन मार्गदर्शन करावे ही विनंती आहे.

    घनश्याम केळकर, बारामती.

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s