अशी उधळली सभा

(मागील भिंत हॅपी बर्थडे, बारशाला यायच हं, मगळागौरीची पुजा, अभिनंदन असल्या पोस्टर्सनी भरलेली असते. एका बोर्डावर मेहंदी आणि टॅटू असे लिहिले असते ठळक अक्षरात शुल्क आकारण्यात येइल असेही लिहिले असते. अमृतानंद स्वीटस, इंडीयन जुगाड प्रस्तुत सोसायटीच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा असे लिहून आपला बंटी म्हणून एक मोठा फोटो असतो. एका ठिकाणी 'फ्री सेल्फी' असा बोर्ड लावून … Continue reading अशी उधळली सभा

वैशालीतला उपमा कि सुदाम्याचे पोहे

शनिवारवाडा, सिंहगड, म्हात्रे पूल, बिडकरची मिसळ या प्रमाणेच वैशाली हे पुणेकरांचे एक अत्यंत आदरांचे स्थान आहे. वैशालीतला उपमा खात आणि फर्ग्युसन वर नजर ठेवीत कित्येकांनी तारुण्यात बहार आणली. अशांनी वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे स्वाभाविक आहे पण एका तीन वर्षाच्या मुलाने वैशालीच्या उपम्याचा जाज्वल्य अभिमान दाखविणे जरा जास्तच होते. दादरला माझ्या मैत्रीणीच्या बहिणीचे लग्न होते. मुलाकडली … Continue reading वैशालीतला उपमा कि सुदाम्याचे पोहे

एक फसलेल नाटक- आणखीन एक

(या एकांकिकेत साराच गोंधळ अपेक्षित आहे. वेषभूषा, नेपथ्थ, संगीत सारा गोंधळ . गोष्ट आणि पात्रे यात गोंधळ तर आहेच. त्यातला आणखीन एक प्रवेश. त्याच कलाकारांची चर्चा चालली आहे. एकूण आठ प्रवेश आहेत. तीन प्रवेश इथे दिले आहेत. एक फसलेले नाटक-१, एक फसलेले नाटक-प्रवेश) मुलगी हे काय रे. संपव, काय चाललय? कशी तुझी पात्रे आहेत ना … Continue reading एक फसलेल नाटक- आणखीन एक

एक फसलेले नाटक

एक फसलेले नाटक या दिर्घांकमधला एक प्रवेश किंवा एक फसलेला प्रवेश. मूळ नाटकाची संकल्पना अशी आहे की एक मुलगा आणि एक मुलगी स्वतः लिहून नाटक करायचे ठरवितात. या नाटकाची संकल्पना कशी उभी होते त्यातलीच ही गंमत. संपूर्ण नाटकात दोनच पात्रे आहेत आणि ते दोघे मिळूनच सारे प्रवेश उभे करतात नंतर त्यावर चर्चा करतात.  एकूण आठ … Continue reading एक फसलेले नाटक

गवत्या

जरा जोर लावूनच गावातल्या घराचे दार उघडले, तसा कर्रर्र आवाज झाला आणि धुळीचा लोट अंगावर आला. मला जोरात ठसका लागला. खोकलतच मी छपरीत एक नजर फिरविली. छपरीत एका बाजूला कापसाचा ढीग आणि दुसऱ्या बाजूला धान्याच्या पोत्यांची रास बघायची सवय असलेल्या माझ्या डोळ्यांना रिकामी छपरी बघवत नव्हती. छपरीतील एका खुंटीला बैलांच्या गळ्यात बांधायच्या घंटा टांगून ठेवल्या … Continue reading गवत्या

सरप धसला कुपात

अशी पऱ्हाटी, अशी वऱ्हाडी खारी म्हणजे गावाले लागून रायते ते वावर, या खारीत ढोरायच्या बरोबरीन माणसायचा बी लय तरास रायते. सकारपासून ते रातरीवरी टमेरल घेउन, जाउन जाउन गाववाले खारीची पार हागणदारी करुन टाकते. रामाच्या खारीच बी तेच झालत. कोणतरी वरडत येउन सांगाव ‘ये रामा खारीत गाय धसली पाय’, रामा हातचा चहाचा कप तसाच ठेवून, धोतराचा … Continue reading सरप धसला कुपात

माझा मोबाइल डायेट

माझा मोबाईल डायेट "मी मोबाइल डायेट करनार आहे.” मी फार मोठा बॉम्ब वगैरे टाकतोय या थाटात बोललो. "हे काय नवीन फॅड?” माझा बॉम्ब हा एक फुसका फटाका आहे अशा तुच्छतेने तिने उत्तर दिले. "अग फॅड नाही. मी मोबाइल वापरनार नाही, मी व्हाटस ऍप वापरनार नाही, फेसबुक बघनार नाही, ट्वीट करनार नाही, युट्युब बघनार नाही म्हणजे … Continue reading माझा मोबाइल डायेट

ढेरपोट्याचा डाव खल्लास…

हवा हि नाकात गेली कि जितकी चांगली तितकीच ती डोक्यात गेली की वाइट. डोक्यात हवा ही जातेच. असे डोक्यात हवा गेलेले नमुने दिसतातच. चार लोक जोकला काय हसले तर तो स्वतःला पुल समजायला लागतो. एखाद्या कार्यक्रमात एखादी कविता काय वाचली तर लगेच गुलजारच्या काव्यातली भाव्यात्मकता हल्ली कमी होत आहे काय? अशी चर्चा करायला लागतो. तिसऱ्या … Continue reading ढेरपोट्याचा डाव खल्लास…

फुटबॉल फायनल आणि जानरावची बायको

(PC: जालावरुन) तुमाले तो माया पुणेवाला सोबती पवन्या आठवते, तो नाही मले नागपूरले ते का करुन रायली बा पिक्चर पाहाले घेउन गेलता तोच. त्यान मले सांगतल फुटबॉलचा वर्ल्ड कप हाय, मॅचगिच पायजो. मले शाळेत असल्यापासूनच फुटबालचा शौक होताच. लाथा माराले कोणाले नाही आवडत जी. भेटला बॉल का मारा लाथा. साऱ्या दुनियेचा राग बॉलवरच काढाचा. मास्तरन … Continue reading फुटबॉल फायनल आणि जानरावची बायको