अशी उधळली सभा

(मागील भिंत हॅपी बर्थडे, बारशाला यायच हं, मगळागौरीची पुजा, अभिनंदन असल्या पोस्टर्सनी भरलेली असते. एका बोर्डावर मेहंदी आणि टॅटू असे लिहिले असते ठळक अक्षरात शुल्क आकारण्यात येइल असेही लिहिले असते. अमृतानंद स्वीटस, इंडीयन जुगाड प्रस्तुत सोसायटीच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा असे लिहून आपला बंटी म्हणून एक मोठा फोटो असतो. एका ठिकाणी 'फ्री सेल्फी' असा बोर्ड लावून … Continue reading अशी उधळली सभा

अंधाधुंद

(P.C. जालावरुन) जरा जास्तच दिस झाले आपल काही बोलण झाल नाही. पण आता का करता जी उनच अस तापल होत का काही लिहूशाच वाटत नव्हत. वरुन लगनसराई, टायमच सापडत नव्हता. म्या इचार केला पाउस पडून जाउ दे मंगच बोलू. पाउस बी असा दडी मारुन बसला का बोलाच काम नाही. अख्या मिरग गेला पण येक थेंब … Continue reading अंधाधुंद

एक फसलेल नाटक- आणखीन एक

(या एकांकिकेत साराच गोंधळ अपेक्षित आहे. वेषभूषा, नेपथ्थ, संगीत सारा गोंधळ . गोष्ट आणि पात्रे यात गोंधळ तर आहेच. त्यातला आणखीन एक प्रवेश. त्याच कलाकारांची चर्चा चालली आहे. एकूण आठ प्रवेश आहेत. तीन प्रवेश इथे दिले आहेत. एक फसलेले नाटक-१, एक फसलेले नाटक-प्रवेश) मुलगी हे काय रे. संपव, काय चाललय? कशी तुझी पात्रे आहेत ना … Continue reading एक फसलेल नाटक- आणखीन एक

ढेरपोट्याचा डाव खल्लास…

हवा हि नाकात गेली कि जितकी चांगली तितकीच ती डोक्यात गेली की वाइट. डोक्यात हवा ही जातेच. असे डोक्यात हवा गेलेले नमुने दिसतातच. चार लोक जोकला काय हसले तर तो स्वतःला पुल समजायला लागतो. एखाद्या कार्यक्रमात एखादी कविता काय वाचली तर लगेच गुलजारच्या काव्यातली भाव्यात्मकता हल्ली कमी होत आहे काय? अशी चर्चा करायला लागतो. तिसऱ्या … Continue reading ढेरपोट्याचा डाव खल्लास…

जानराव जगदाळे: येका संडासाची कथा

अमदा आमच्या सल्लू भाईची ट्यूबलाइट काही पेटली नाही, पार फ्युज उडाला. लइ बेक्कार वाटल जी. सालभर भाइच्या पिक्चरची वाट पायलीआन असा पचका झाला. सल्लू भाइनच असा पचका केल्यावर आम्ही कोणाचे पिक्चर पाहाचे? आता टायगर येउन रायला हाय. तसा खिला़डी भारी हाय, मस्त फाइटा मारते पण तो बी फायटा गियटा माराच्या सोडून संडासवाला पिक्चर घेउन आलता. … Continue reading जानराव जगदाळे: येका संडासाची कथा

राजा बेवड्याची गोष्ट

पुर्वप्रकाशित मिसळपावच्या दिवाळीअंकाच्या दृकश्राव्य विभागासाठी लिहलेली कथा लिखित स्वरुपात देत आहे. गोष्ट तशी जुनी हाय दाहाक बरस तरी जुनी असन. सकायी उठून टमरेल घेउन जानाऱ्या बायांले गावच्या शिवेवर राजाचा मुडदा दिसला आन हे बातमी गावात हा हा म्हणता पसरली. पसरली म्हणजे बायांयन पसरवली. बाया टमरेल घेउन शिद्द्या बोरींगवर आल्या. त्या टायमाले त्यायन हा इचार नाही … Continue reading राजा बेवड्याची गोष्ट

मी व्यायाम करतो

'ते वळण माझ्या आयुष्याला दिशा देनारे ठरले.' कित्येक मोठी लोक अशा प्रकारची वाक्ये त्यांच्या आत्मचरीत्रात फेकत असतात. वळण त्यांच्या आयुष्यात आले म्हणून ते मोठे झाले नाहीतर त्यांचेही आयुष्य आमच्यासारखेच वर्षाकाठी मिळनाऱ्या चार टक्के वाढीच्या मागे धावण्यातच गेले असते. सारे श्रेय त्या वळनाचेच पण ही माणसे उगाचच आत्मचरीत्र वगेरे लिहून सारे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात. आमच्या … Continue reading मी व्यायाम करतो

ते का करुन रायली असन बा

माया एक सोबती हाय, पवन्या. हाय आमच्या गावचंच पोरगं, पण आता पुण्याले रायते तर सोताले साहेब समजते. दहावीत पहल्यांदी नापास झालता. ते इंग्रजी गाववाल्यायले रडवतेच न जी. मंग सप्लीमेंटरीच्या टायमाले म्याच माया काकाले घेउन त्याले पेपर तपासनाऱ्या मास्तरकड घेउन गेलतो. तसं पोरगं हुशार होतं, फक्त इंग्रजीच तरास देत होती. तसबी इंग्रजी शिकून कोठ कालेजात प्रोफेसर … Continue reading ते का करुन रायली असन बा

जिता असल्याचा दाखला

लय जुनी नाही, आता आताचीच गोष्ट हाय, २०४७ सालातली. देशाले स्वातंत्र भेटून शंभर वर्षे झाले. या शंभर वर्षात जमाना बदलला. आजकाल जेथ तेथ अंगूठा लावा लागते. बँकेतून पैसे काढाचे हाय - लावा अंगूठा, मत टाकाच हाय - लावा अंगूठा, कंट्रोलच सामान उचलाच हाय - लावा अंगूठा. मोठाला साहेब असू द्या नाहीतर गावातला पोट्टाबाट्टा असू द्या, … Continue reading जिता असल्याचा दाखला

परत वरात – २

परत वरात पासून पुढे सुरु (वाऱ्यावरची वरात या पुलंच्या नाटकाने तुम्हा आम्हा सर्वांच्या मनावर गेली कित्येक वर्षे राज्य केले. आज त्या वरातीचे स्वरुप कसे असू शकेल, आज ती वरात कशी निघू शकेल ह्याचा शोध घेण्याचा एक तोकडा प्रयत्न. शेवटी ही वाऱ्यावरची वरात, तेंव्हा पुलंनीच सांगितल्याप्रमाणे यात साहित्यिक मूल्य वगेरे शोधण्याचा प्रयत्न करु नये. डोळ्याची बटन … Continue reading परत वरात – २