Catch-22: धरल तर चावतं

दुसऱ्या महायुद्धाचा काळ. रोमपासून काही अंतरावर जर्मनी आणि इटली यांच्या सीमेवरील पियानोझा नावाचे बेट, जिथे अमेरिकन सैन्याचा तळ आहे. अमेरिकन सैन्य जर्मन फौजांपासून इटलीचे संरक्षण करण्यासाठी तैनात आहे. गेली काही वर्षे झाली, हे सैनिक त्यांच्या देशापासून दूर याच बेटावर तैनात आहे. अशात एका सैनिकाची तब्येत बिघडली. तो मरायला टेकला. त्याच्या घरच्यांना कळविण्यात आले, पण त्याच्या … Continue reading Catch-22: धरल तर चावतं

वैशालीतला उपमा कि सुदाम्याचे पोहे

शनिवारवाडा, सिंहगड, म्हात्रे पूल, बिडकरची मिसळ या प्रमाणेच वैशाली हे पुणेकरांचे एक अत्यंत आदरांचे स्थान आहे. वैशालीतला उपमा खात आणि फर्ग्युसन वर नजर ठेवीत कित्येकांनी तारुण्यात बहार आणली. अशांनी वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे स्वाभाविक आहे पण एका तीन वर्षाच्या मुलाने वैशालीच्या उपम्याचा जाज्वल्य अभिमान दाखविणे जरा जास्तच होते. दादरला माझ्या मैत्रीणीच्या बहिणीचे लग्न होते. मुलाकडली … Continue reading वैशालीतला उपमा कि सुदाम्याचे पोहे

अंधाधुंद

(P.C. जालावरुन) जरा जास्तच दिस झाले आपल काही बोलण झाल नाही. पण आता का करता जी उनच अस तापल होत का काही लिहूशाच वाटत नव्हत. वरुन लगनसराई, टायमच सापडत नव्हता. म्या इचार केला पाउस पडून जाउ दे मंगच बोलू. पाउस बी असा दडी मारुन बसला का बोलाच काम नाही. अख्या मिरग गेला पण येक थेंब … Continue reading अंधाधुंद

जाब

"ब्रुटस दाउ टू, ब्रुटस दाउ टू" तो जिकडे जात होता तिकडे हेच ऐकत होता. तो कान बंद करीत होता तरी ते आवाज त्याच्या कानात घुमत होते. तो या आवाजापासून जितका दूर पळत होता तितका तो आवाज त्याचा पाठलाग करीत होता. रस्त्यावरच्या गर्दीत मिसळला तर रस्त्यावरच्या गोंधळातही तो आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होता. तो दूर … Continue reading जाब

गवत्या

जरा जोर लावूनच गावातल्या घराचे दार उघडले, तसा कर्रर्र आवाज झाला आणि धुळीचा लोट अंगावर आला. मला जोरात ठसका लागला. खोकलतच मी छपरीत एक नजर फिरविली. छपरीत एका बाजूला कापसाचा ढीग आणि दुसऱ्या बाजूला धान्याच्या पोत्यांची रास बघायची सवय असलेल्या माझ्या डोळ्यांना रिकामी छपरी बघवत नव्हती. छपरीतील एका खुंटीला बैलांच्या गळ्यात बांधायच्या घंटा टांगून ठेवल्या … Continue reading गवत्या

सरप धसला कुपात

अशी पऱ्हाटी, अशी वऱ्हाडी खारी म्हणजे गावाले लागून रायते ते वावर, या खारीत ढोरायच्या बरोबरीन माणसायचा बी लय तरास रायते. सकारपासून ते रातरीवरी टमेरल घेउन, जाउन जाउन गाववाले खारीची पार हागणदारी करुन टाकते. रामाच्या खारीच बी तेच झालत. कोणतरी वरडत येउन सांगाव ‘ये रामा खारीत गाय धसली पाय’, रामा हातचा चहाचा कप तसाच ठेवून, धोतराचा … Continue reading सरप धसला कुपात

नूतन वर्षाभिनंदन २०१९

मित्रहोच्या सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. २०१९ हे वर्ष सर्वांना सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे आणि उत्तम वाचनाचे जावो हीच मनःपूर्वक शुभेच्छा. उत्तमोत्तम साहित्याशी तुमचा परिचय होवो. २०१८ मधे मित्रहोवर काय लिखाण आले तर विनोदाचा पिेंड सोडला नाही. वेगवेगळ्या प्रकारे विनोद लिहिण्याचा प्रयत्न मी केला. वऱ्हाडी भाषेतल्या कथा, व्यक्तिचित्र, तर शहरी जीवनातील विसंगती असे सारे लिखाण … Continue reading नूतन वर्षाभिनंदन २०१९

ते दोघे – टू रॉनीज

(P.C. : जालावरुन) सत्तर अंशीच्या दशकातला बीबीसीचा शो, तोही कॉमेडी शो, तोही सलग सतरा वर्षे आणि करनारे फक्त ते दोघे, कमाल आहे ना. त्या दोघांनी ही कमाल करुन दाखविली. १९७१ ते १९८७ या सतरा वर्षाच्या कालावधीत त्यांनी लोकांना खळखळून हसविले. ते दोघे होते टू रॉनीज, रॉनी बार्कर आणि रॉनी कॉर्बेट. या शोचे मुख्य वैशिष्ट म्हणजे … Continue reading ते दोघे – टू रॉनीज

ती आणि तो

  आजूबाजूला दिसनारी सर्वसामान्य माणसे किंवा आपल्या आसपास घडनाऱ्या आणि वरकरणी सामान्य वाटनाऱ्या घटना कधीकधी बरेच काही शिकवून जातात. असाच अनुभव मला काही वर्षापूर्वी म्हैसूरवरुन बंगलोरला येताना आला होता. मी कुटुंबासमवेत म्हैसूरवरुन बंगलोरकडे येत होतो. आणि रात्रीच्या जेवणासाठी थांबलो होतो. स्थळ: बंगलोर म्हैसूर रोडवरील मदुरच्या जवळचे एक अडीगाज चे जॉइंट. वेळ: रात्रीचे सव्वानउ साडेनउ. बंगलोरमधे अडीगाजच्या … Continue reading ती आणि तो

सिनेमावाला विज्या

"विज्या, आज कॉप्या पुरवता नाही येत आपल्याले" मी धावतच सेंटरच्या बाहेर उभ्या असलेल्या विज्याच्या गँगला सांगितले. "कोण अडवते बे आमाले?” पोरे माझ्यावरच ओरडली. "थांबा बे पोट्टेहो." विज्याच्या एका आवाजात पोरे चूप. त्याने त्याच्या बच्चन कट केसातून हात फिरविला, डाव्या हाताने मानेवरचे केस उडविले, विडीचा धूर सोडला आणि मला विचारले, "पण काहून बे बारक्या?" "मास्तर सांगत … Continue reading सिनेमावाला विज्या