माझा जॉली होतो तेंव्हा

“यावेळेस दिवाळीला फराळाचा एक पदार्थ तू बनवायचा.” रविवारी सकाळी मी अंथरुणात लोळत पडलो असताना आमच्या हीने बॉम्ब टाकला. उंच धिप्पाड … माझा जॉली होतो तेंव्हा वाचन सुरू ठेवा

Rate this:

मी व्यायाम करतो

‘ते वळण माझ्या आयुष्याला दिशा देनारे ठरले.’ कित्येक मोठी लोक अशा प्रकारची वाक्ये त्यांच्या आत्मचरीत्रात फेकत असतात. वळण त्यांच्या आयुष्यात … मी व्यायाम करतो वाचन सुरू ठेवा

Rate this:

तिचे न येणे

Resha_Molkirin

(नोंद: हे चित्र बोलक्या रेषावरुन श्री घनश्याम देशमुख यांच्या पूर्व परवानगीने इथे देण्यात आलेले आहे.)

“ट्रींग, ट्रींग, ट्रींग”
सकाळी सकाळी लँड लाइन माझ्यासाठी वाजतच नाही याची पूर्ण खात्री असल्याने मी त्याकडे दुर्लक्ष करीत बेडवर लोळलो होतो परंतु आता झोपमोड झाली होती. मी फार गोड स्वप्नात वगेरे होतो असे काही नाही. चाळीशी उलटल्यावर काय गोड स्वप्ने पडनार म्हणा. स्वप्नात पण आमची भरारी कुणी सुंदर मुलगी विंडो सीटवर बसली आहे, मी आयल सीटवर आणि मधली सीट रिकामी आहे यापलीकडे जात नाही. फारच झाले तर कुठले तरी देखणे स्थळ धावत धावत, केस भुरभुर उडवीत मला कुठल्यातरी भौगोलीक स्थळाचा पत्ता विचारीत आहे आणि आम्ही समोर उभे असलेले स्थळ बघायचे सोडून दूरच्या भौगोलिक स्थळाकडे बोट दाखवतोय. असल काहीतरी भयंकर वेडेपणाचे स्वप्न पडत. अशा देखण्या स्थळांना स्वप्नात सुद्धा आमच्या अर्ध्या पांढऱ्या केसांवर विश्वास वाटत असावा. वय जसेजसे वाढत जाते तसतसे स्वप्न आणि सत्यातला फरक कमी होत जातो त्यामुळे स्वप्न पाहण्यातली गंमतच संपून जाते.

“अरे देवा, काय सांगते? ती येणार नाही आज.” शेअर मार्केट कोसळल्यावर टिव्हीवाले त्या ब्रोकरचे पडलेले चेहरे दाखवतात ना तसला चेहरा करुन ही बोलत होती. हिला असा धक्का बसला होता जणू काही रशियाने अमेरीकेवर बॉम्बिंग सुरु करुन तिसऱ्या महायुद्धालाच वाचा फोडली. काही क्षण सारे कसे शांत शात होते. धक्क्यातून सावरल्यावर हिने परत बोलायला सुरवात केली.
“ती अशीच करते ग, वेळेवर धोका देते. आपण यांचे इतके लाड करतो पण यांना काही नाही ग त्याचे. मी तिला कालच एक ड्रेस दिला अन तिने आज मलाच चाट मारली.”

तिचे लाड होतात हे मात्र खरे होते. बायका वय वाढल्यावर गळू लागलेल्या पांढऱ्या केसांनंतर जर कुणाची जास्त काळजी करीत असतील तर ती असते तिची. नवऱ्याने साधा चहा जरी मागितला तरी एखाद गल्लीतल कुत्र भसकन अंगावर याव तसे ओरडल्या जाते ‘ही काय चहा प्यायची वेळ आहे.’ कधी मूड आला म्हणून आमलेट करायला जावे तर लगेच सूचना येते ‘ते अंड नको घेऊस, मला केसांना लावायचे आहे’. तिचे मात्र तसे नसते, तिचे लाड चाललेले असतात. तिला दहा वाजताही थंडी वाजते म्हणून चहा दिला जातो, सकाळी सात वाजताही भूक लागली म्हणून नाष्टा दिला जातो. उद्देष काय तिने उद्या चाट मारायचा विचार केला तर इतरांकडे चाट मारावी पण आपल्याकडे नाही. तिचे असे लाड करुनही ती आली नाही म्हणजे केवढा मोठा विश्वासघात. आता लग्नाला फक्त तेरा वर्षे झाली, त्या लग्नात घेतलेला तो ड्रेस गेली आठदहा वर्षे कुठल्यातरी गाठोड्यात बांधून होता. परवा बरीच वर्षे बंद असलेल्या कपाटाची साफसफाई करताना तो ड्रेस सापडला. तो तसाच फेकून देण्याएवजी तिला देउन दानाचे पुण्य पदरात पडण्याचा निर्णय झाला. या पुण्यांत आमचा काहीच वाटा नाही हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच. कर्णाच्या कवचकुंडलला लाजवेल असे दान (तेरा वर्षे जुना असला तरी माहेरचा ड्रेस होता तो) देउनही आज ती कामाला आली नाही म्हणजे केवढा मोठा विश्वासघात. ह्यापेक्षा मोठ्या विश्वसाघाताची नोंद भारताच्या इतिहासात सापडनार नाही. तशी नोंद आहे हे शोधण्याचा आगाऊपणा इतिहासाकारांनी करु नये, तसे काही करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची जी गत होइल त्यास आम्ही जबाबदार नाही.

“अरे लोळत काय बसलाय? उठ आता. आज ती येऩार नाही.”

मला ताकीद मिळाली. मी ऐकू येउनही न ऐकल्यासारखे केले. मग दोन वेळा तेच शब्द तार सप्तकात उच्चारल्या गेले. आता ती येणार नाही हा काय माझा दोष होता? मी काय तिला फोन करुन सांगितले बाई येऊ नको म्हणून. बर मी लोळायचा थांबलो म्हणून ती का पळत येनार होती? मी शिंकायचा थांबलो म्हणून का ओबामाची सर्दी बसनार होती. समजा उठलो तर उठून काय मोठा पराक्रम गाजवनार होतो मी? तसेही कधी कोणता पराक्रम गाजवला आहे मी? तिला तिच्या घरी जाउन दोन्ही हातावर उचलून आणनार होतो? का तिच्या समोर जाउन नाक घासनार होतो ये बाइ. म्हणे ती येनार नाही उठ आता. कशाला उठू. ती येत नाही ना चांगलेच आहे. कामवाली बाई हे प्रकरण असत ते फक्त व्हॉटस अॅपच्या जोकमधेच नाहीतर होस्टेलवरच्या पुस्तकात. प्रत्यक्षात मला तरी कामवाली बाई म्हणजे बायकोने नवऱ्याचे स्वातंत्र्य बळावण्यासाठी आरंभलेल्या अत्याचाराचा वस्तुनिष्ठ परीपाठच वाटतो. ती आली की फक्त टॉवेल गुंडाळून उघडेबंब घरात फिरता येत नाही. पलंगावर तंगड्या वर करुन मनसोक्त लोळता येत नाही. ती झाडायला आली की तुम्हाला पाय वर घेउन सोफ्यावर नाहीतर खुर्चीवर आकुंचन पावलेल्या गोळ्यासारखे बसावे लागते. उन्हाळ्यात ती झाडतेय म्हणून तुम्ही पंखा लावू शकत नाही की डिसेंबरच्या थंडीत लादी सुकायची आहे म्हणून तिने लावलेला पंखा तुम्ही बंद करु शकत नाही. भलेही त्या पंख्यामुळे तुम्हाला नागपूरच्या दिवाणखान्यातही काश्मिरचा अनुभव येत असेल. तो एक दीड तास मला माझ्याच घरात बंदीस्त असल्यासारखे जगावे लागते. ती अँग सँग सु की किंवा नेल्सन मंडेला यांच्याप्रमाणेच भारतातला नवरा या जमातीतला पुरुष रोज तास दीड तास स्वतःच्याच घरात बंदीस्त असतो पण याचे या देशात कुणालाच सोयरसुतक नाही. पुरस्कार वगेरे जाऊ द्या या त्यागाची सरकारी दरबारी साधी नोंदसुद्धा नाही. रोज असे बंदिस्त जीवन जगल्यावर ती आज येत नाही हे स्वातंत्र्य शँपेन उघडून सिलिब्रेट करण्यासारखी गोष्ट होती. नवऱ्यांना असे उघड उघड काहीच सिलिब्रेट करता येत नाही, सिगरेट प्यायची आहे बाहेर जाऊन प्या, दारु प्यायची आहे दार लावून घ्या. घरातील नवऱ्याचे स्वातंत्र्य हे हुकुमशाही राजवटीतल्या लोकशाहीसारखे असते, सार काही कोपऱ्यात. तेंव्हा परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दूरची आत्या गेल्यासारखा सुतकी चेहरा करुन मी उठलो. एका सहानुभुतीपूर्ण नजरेने हीच्याकडे बघितले. तुझ्यावर फार मोठे संकट कोसळलेय, तू घाबरु नको मी तुझ्या सोबत आहे वगेरे भाव चेहऱ्यावर आणले. असला अभिनय करायच सवय झाल आहे आता. तो सुतकी चेहरा घेउन सरळ बाथरुममधे शिरलो आणि आत जाउन मनातल्या मनात पोटभर हसून घेतले.

“ती आज पण येनार नाही. तिला सुट्टी मारायची सवयच झाली आहे बघ. तिला आता पुढच्या महीन्यापासून बंदच करते.”
ही बडबड माझ्या कानावर पडत होती. मी मनातल्या मनात तिने याआधी कधी सुट्टी घेतली ते आठवत होतो. गेल्या महीन्याभरात तरी तिने सुट्टी घेतल्याचे आठवत नव्हते पण हे सत्य मी हिला सांगू शकत नव्हतो. सत्य हे तुम्ही कुणाला सांगता आणि कितपत सांगता यावरच त्याची सत्यता अवलंबून असते. मी जर हीला सांगितले की तिने महीनाभरात सुट्टी घेतली नाही तर लगेच तिच्या सुट्ट्या बऱ्या लक्षात राहतात असे म्हणून आमच्यावरच भलते संशय घेतले जायचे. बर हीची बाजू घेतली तर ही कोणत्या कामाला जुंपवील काही सांगता येत नाही. अशा प्रसंगी मी माझे ठेवणीतले शस्त्र वापरतो माझा टूथ ब्रश. तो ब्रश घ्यायचा, त्यावर पेस्ट टाकायची, तो ब्रश तोंडात टाकायचा आणि मग बोलायचे. असे केल्याने मी कोणाची बाजू घेतोय हे हिलाच काय साक्षात ब्रम्हदेवालाही कळत नाही. तसा ब्रश वगेरे सारख्या उगाचच वैयक्तीक स्वच्छतेच्या (स्वच्छतेचा कर भरत असलो तरीही) आयुधांचा मी कट्टर विरोधक आहे. वैयक्तीक स्वच्छता ही पश्चिमेकडून वाहलेल वार आहे अस माझ स्पष्ट मत आहे. मी पश्चिम वाऱ्याचा विरोधी आहे असे नाही उलट पश्चिमी देशात फिरायला मलाही आवडते. पण स्वच्छतेच्या बाबतीत ऐकायचे तर कोणाचे त्या अमेरीकन नाहीतर इंग्रजाचे जो जेवणानंतर कधी साधी चूळ भरीत नाही, सकाळी उठल्यावर जिथे पाणी वापरायचे तिथे पेपर वापरतो. अशा माणसाकडून आम्ही स्वच्छतेचे धडे गिरवायचे. असे टूथ ब्रश वापरुन काय मोठा फरक पडलाय, कुण्या दंतवैद्दाचे दुकान बंद पडल्याचे दिसत नाही उलट दर महीन्याला एक नवीन पाटी दिसते. वैयक्तीक स्वच्छता ही भांडवलवादी, बाजारपेठभिमुख, कॉर्पोरेट धर्जिण्या अर्थव्यवस्थेने कुटील स्त्रीयांशी संगनमत करुन स्वच्छंदी पुरुषावर लादलेली सक्तमजूरी आहे असे माझे मत मी दोन थेंब पोटात गेल्यावर भरनाऱ्या परीसंवादात नेहमी मांडत असतो. आमच्या ह्या युक्तीवादाला मी माझ्या अंगभूत आळसाला उगाच दिलेली तात्विक बैठक आहे असे समजून समस्त स्त्रीवर्गाकडून दुर्लक्षिल्या जाते आणि आमची सक्तमजूरी कायम राहते.

आजही मी तोंडात ब्रश टाकून बाहेर आलो. घासलेली कॅसेट, लोखंडावर घासलेला ब्रश आणि कढईत घासलेला चमचा यांचे ध्वनी एकत्र करुन जी ध्वनी कंपने तयारी होतील अशाच ध्वनी लहीरीत मी काहीतरी बोललो. आश्चर्य म्हणजे मलाही न कळलेले हिला मात्र पक्के कळले आणि मी तिचीच बाजू घेतोय अशी तिची ठाम (गैर)समजूत झाली. याला म्हणतात आत्मविश्वास यांना अंधारात सुद्धा काळे डाग दिसतात. ब्रश वगेरे झाल्यानंतर Proactive Defense Strategy चा भाग म्हणून सरळ किचनमधे जाउन चहा बनवायला घेतला. चहा सापडत नाही, साखर सापडत नाही अशा भिकार कारणासाठी कसलीही कुरकुर केली नाही उलट स्वतःमधल्या ब्योमकेश बक्षीला जागवले. घरातला प्रत्येक डब्बा उघडून चहा साखरेचा शोध घेतला. फ्रिजरमधून काढलेल्या पांढऱ्या गोळ्याला गॅसवर ठेवून विश्वामित्राच्या धीरगंभीर तपस्येच्या मुद्रेने दुधात परिवर्तित होण्याची वाट बघितली. असला दुग्ध शर्करा योग आयुष्यात परत येऊ देऊ नको हीच प्रभुचरणी प्रार्थना. असा ऋषितुल्य तपस्येने बनवलेला अमृततुल्य चहा घेउन मी माझ्या मेनकेकडे गेलो. तिकडे वणवा पेटला होता. व्हॉटस् अॅप, एसएमएस, इंटरकॉम अशा अत्याधुनिक संपर्क साधनांचा वापर करुन ‘ती आज येनार नाही’ ही बातमी संपूर्ण सोसायटीत पसरली होती. कुठलीही बातमी पसरविण्यात स्त्रीवर्गाचा हात कुणी धरु शकत नाही. तसाही तो धरण्याचा कोणी प्रयत्न करु नये आयुष्यभराचा पश्चाताप होतो. मला वाटते ही इकडली माहीती तिकडे करण्याच्या अंगभूत गुणकौशल्यामुळे पूर्वीच्या काळी टेलीकॉम ऑपरेटर म्हणून स्त्रीयांना घेत असावे. आताही त्या नेटवर्क मधे राउटरएवजी स्त्रीवर्गालाच उभे करायला हवे म्हणजे डाटा रेट दहा पटीने वाढेल. त्याने तो बिचारा सिस्कोचा जॉन चेंम्बर्स मात्र भिकेला लागेल हा भाग निराळा.  पुढे वाचा तिच्या न येण्याची गंमत

जरा हलके घ्या

या ढाच्यावर इमारत कधी उभी राहीली ते कळलेच नाही.
या ढाच्यावर इमारत कधी उभी राहीली ते कळलेच नाही.

  पूर्वी हे Alumni Meet वगेरे फक्त IIT किंवा IIM वाल्यांचेच चोचले होते बाकी कुणाचे कॉलेजविषयीचे प्रेम असे उफाळून वगेरे येत नव्हते. दुसरा एक विचार हाही होता की आपल्या कॉलेजात जाउन त्याविषयी प्रेमाचे भरते येणे हे फक्त त्या IIT/IIM वाल्यांसाठीच ‘अर्थ’पूर्ण होते तेंव्हा इतरांनी कशाला नसत्या फंदात पडावे. मला तर नेहमी हे Alumni Meet म्हणजे कायदेशीर घटस्फोट घेतलेल्या बायकोला वर्षातून एकदा भेटायला जाण्याचाच प्रकार वाटत होता. आता माहीती क्रांतीमुळे म्हणा किंवा आणखीन कशाने म्हणा हल्ली साऱ्याच शाळा कॉलेजच्या मुलामुलींना असे स्वतःच्या शाळा कॉलेजविषयी प्रेमाचे भरते यायला लागले आहेत. जसजशी डिसेंबरच्या हिवाळ्याची थंडी वाढत जाते तसतसे फेसबुक असल्या मीटच्या अपडेटनी भरले जाते. मग त्याविषयीचे स्टेटस, फोटोज यांचा सोशल मिडीयावर भडीमार सुरु होतो. पूर्वी आठदहा मित्रमैत्रीणी, आजूबाजूची दोन झाडे घेउन ही फोटोत बरीच जागा सुटलेली वाटायची आता मात्र त्या झाडांचे जाउ द्या, पॅनोरामा व्ह्यू घेउनही तेच मित्र एका फोटोत बसत नाहीत. कदाचित त्या कारणाने की काय पण जानेवारी मधे सकाळी धावनाऱ्यांची किंवा चालनाऱ्यांची गर्दी वाढलेली असते. निदान पुढच्या मीट च्या वेळेला तरी एका फोटोत यायला हवेत.

  ही मंडळी एकत्र जमून करतात काय तर कॉलेजच्या जुन्या गोष्टी आठवतात. आठवून आठवून अस काय मोठ आठवाव तर हीच ती जागा जिथे मी पहीली सिगेरेट ओढली होती तर कुणी म्हणतो हीच ती रुम जिथे मी बियरचा पहीला कडू डोस डोळे मिटून प्यालो होतो. जुन्या पिढीतल्यांना कदाचित हेच ते झाड ज्याच्याखाली मी पहील्यांदी तिचा हात हातात घेतला होता असे पहीले प्रेमप्रकरण वगेरे आठवत असावे. हल्ली पहीले प्रेमप्रकरण आणि पहीला प्रेमभंगसुद्धा शाळेतच आटोपतो तेंव्हा तसे काही आठवायचे म्हटले तर शाळेत जावे लागते. जर कुणी कॉलेजमधे पुढची पायरी ओलांडली असेल तर त्याची आठवण मात्र निराळी. बाकी कॉलेजातली प्रेमप्रकरणे हे महीन्याच्या मनी ऑर्डरीसारखी असतात आठवडा भराच्या वर टिकत नाही. बाजूच्याला असे काही आठवले की माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसाला काही थुकराट प्रश्न पडतात या साऱ्याचे शैक्षणिक महत्व काय? वगेरे. असे मी एक मित्राला विचारले तर तो म्हणाला ‘कुणी सांगितले शैक्षणिक आठवत नाही’ असे म्हणत त्याने एका विद्यार्थ्याला विचारले ‘कारे हे इंजिन अजूनही बंदच. गेल्या वीस वर्षात कुणीही सुरु करु शकला नाही का?’ आता हे शैक्षणिक. मागे एक मित्र तर जवळ जवळ ओरडलाच ‘वॉव सीआरटी मॉनिटर! त्या एलइडी मॉनिटरला ह्या सीआरटीची सर नाही. इथे कसा आपलेपणा वाटतो’. आता मी असल्या शैक्षणिक गोष्टीचा विचार करणे सोडून दिले. तसेही हे प्रेमाचे भरते कशाच्या बाबतीत आले यापेक्षा ते कुणाला आले हे अधिक महत्वाचे असते. कुणी ज्या कॉलेजात शिकला त्याने त्यानंतर त्याची उभी हयात केवळ कॉलेज प्रेमापोटी त्याच कॉलेजात प्राध्यापकी करण्यात वाया घालविली. अशा व्यक्तीला आलेले कॉलेज प्रेमाचे भरते ऐकूण घ्यायला कुणालाही वेळ नसतो. भलेही बिचारा फारच आदर्श वगेरे विद्यार्थी असेल. बिचाऱ्याने कॉलेजमधे असताना कुठलाही क्लास कधी बंक केलेला नसेल, सबमिशन वेळेवरच केलेले असेल याउलट ज्याने जमेल तेवढे क्लासेस बंक केले, सबमिशनपेक्षा मुलीला प्रेमपत्र लिहीण्यात जास्त वेळ घालवला पण आज मात्र कुण्या कंपनीचा सीइओ वगेरे आहे. अशा व्यक्तीला आलेले प्रेमाचे भरते ऐकायला मात्र हाउसफुलचा बोर्ड लावावा लागतो. ती प्राध्यापिका सुद्धा (जी त्यावेळी त्याच कॉलेजची विद्यार्थीनी असते) जिला प्रेमपत्र लिहीण्यात याने वेळ घालवला होता आणि सबमिशनच्या टेंशनमधे ते प्रेमपत्र न वाचताच तिने सबमीशन सोबत जोडून दिले होते, तेच प्रेमपत्र वाचून प्राध्यापकाने तिला मागणी घातली होती, आज पहील्या रांगेत बसून जीवनाचा अर्थसंकल्प उलगडीत असते.

पुढे वाचा

मी कार घेतो

कार
कार घेणे

(नोंद: हे चित्र बोलक्या रेषावरुन श्री घनश्याम देशमुख यांच्या पूर्व परवानगीने इथे देण्यात आलेले आहे.) मला तरी कार घ्यायला स्वतःला सोडले तर इतर कुणाला विकायची पाळी आली नाही.

मनमोहनसिंगानी तब्बल दहा वर्षे मौनव्रत का सोडले नाही किंवा केवळ दहा महिन्यात ओबामाला नोबेल पारितोषिक कसे मिळाले या प्रश्नांसाखाच जटील, गुंतागुंतीचा आणि गहन प्रश्न म्हणजे तुम्ही आम्ही कार का घेतो? कार घेतल्याने प्रदूषण निर्माण होते, कारमुळे रस्त्यावरचे ट्रॅफिक वाढते, या देशात कार पार्क करण्यासारख दुसरा वैताग नाही. कार हे एक ‘Deprecating Asset’ आहे आज घेतलेल्या कारची किंमत उद्या अर्धी होते. कार सांभाळणे म्हणजे बायको सांभाळण्यासारखे आहे; कारला लागनाऱ्या पेट्रोलचे भाव आणि बायकोच्या मागण्या सारख्याच दराने वर चढत असतात. या साऱ्या गोष्टींची परीपूर्ण कल्पना असूनही तुम्ही आम्ही कार घेतो. नुसते घेतो नाही तर त्याचे परिवारासहीत फेसबुकवर फोटो लावतो. शंभर पब्लीक त्याला लाइक सुद्धा करतात. तसेही लोकांना काय कुणाच्या बारशापेक्षा कुणाच्या तेराव्याला जाण्यातच जास्त उत्साह असतो. एकंवेळ लग्नाचे सारे दुष्परीणाम माहीती असूनही तुम्ही आम्ही लग्न का करतो याचे उत्तर सापडेल पण कारचे सारे दुष्परीणाम माहीती असूनही तुम्ही आम्ही कार का घेतो याचे उत्तर शोघणे फार कठीण आहे.

तर अशाच एका दुर्दैवी संध्याकाळी मला पण कार घेण्याची दुर्बुद्धी झाली. अशा माझ्या टुकार, थोतांड विचारांना तेथेच थोपवायचे सोडून माझी बायको त्याला जोमात प्रोत्साहन देत होती. कोण, कधी, कुठे आणि कशाला प्रोत्साहन देइल काही सांगता येत नाही. ‘हा बघ सूर्य आणि हा जयद्रथ’ अगदी या थाटात रोज प्रोत्साहन देणे चालले होते आणि मी बुद्धीला जंग चढल्यासाऱखा त्यात वाहवत चाललो होतो. बंगलोरला माझ्या ऑफिसच्या रस्त्यावरच एक कारचे शोरुम होते मी रोज ऑफिसला जाताना तिथे माझी स्कुटर थांबवून त्या शोरुममधल्या कारकडे बघत उभा राहत होतो. त्या काचेच्या मागच्या कार मला रॅम्पवर उभ्या असनाऱ्या मॉडेलसारख्या भासत होत्या. त्यांचे ते रंगीबेरंगी कपडे(Colors), तो कमनीय बांधा (Aerodynamic design) , ते कोरीव डोळे(Headlights), ते लुसलुशीत ओठ (Radiator) सारे मला आव्हान करीत होते. मी तिथेच थांबून त्यांच्याकडे असा एकटक बघत उभा राहायचो. मग कोणीतरी मागचा जोर जोरात हॉर्न वाजवून माझी तंद्री भंग करायचा, अशा वेळेला त्या कारवरुन नजर हटवून ऍक्टीव्हाकडे बघण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्या कारकडे बघितल्यावर माझ्या ऍक्टीव्हा कडे बघणे म्हणजे फॅशन टिव्ही चालू असताना बायकोकडे बघण्यासारखे होते. पण करता काय सत्य कितीही विदारक असले तरी ते सत्यच असते.

माझे हे रोजचेच झाले होते मी रोज तसाच उभा राहत होतो. वाटत होते असेच पळत जावे आणि त्या स्टीरींगवर ताबा मिळवावा, ते ऍक्सीलेरटर जोरात दाबावे आणि असाच फेरफटका मारावा बिनधास्त. पण तेथेच घोड मरत होत, त्या चकचकीत बिल्डींग मधे प्रवेश करायची हिम्मतच होत नव्हती. रोज एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचा जप करुन घरुन निघत होतो पण त्या शोरुमसमोर आलो की माझे पाय कसल्यातरी अनामिक भितीने लटलट कापत होते. हे असे बरेच दिवस चालले होते. शेवटी एक दिवस मोठी हिम्मत करुन आत घुसलोच. पूर्ण गोंधळलेला होतो काय करावे काही सुचत नव्हते तेंव्हा दाराच्या जवळच उभा होता. आत साराच कारभार चकचकीत आणि गुळगुळीत होता. त्या इंद्रप्रस्थातल्या मायामहालात शिरल्यासारख वाटत होत. कुठे आपण या टाइल्सवर पाय घसरुन पडून त्या दुर्योधनाची मायामहालात झाली होती तशी आपली फजिती होते की काय अशी सारखी भिती वाटत होती. काही झाले तरी तो दुर्योधन होता त्या अपमानाच बदला म्हणून त्याने पांडवांना द्यूत खेळायला भाग पाडले, त्यांना वनवासात पाठवले, कुरुक्षेत्र घडविले. आयुष्यात काहीही झाले तरी मूग गिळून बसायची सवय लागलेल्या माझ्या सारख्याला असला जुगार खेळणे शक्य नव्हते. समजा कधी आम्ही असले काही करण्याचा विचार केला तर आधी आमच्याच घराचेच कुरुक्षेत्र होण्याची शक्यता जास्त होती. आमच्या घरच्यांना माझी कुवत चांगली ठाउक आहे त्यांना माहीती आहे कितीही झाले तरी आमचा दुर्योधन कधीच होउ शकत नाही, झालाच तर तो युधिष्ठीरच होइल. आपणच आपली पावले सांभाळलेली बरी असा सोयीस्कर विचार करुन मी तेथे नुसता उभा होतो. फॉर्मल ट्रॉउझर आणि शर्ट घातलेल्या मुली इकडून तिकडे भटकत होत्या. कस्टमर्सच्या अंगावर लेवाइस, किलर्स, टॉमी हिलफिगर, लुइस फिलिप्स, इंडिगोनेशन या सारख्या ब्रँडचे प्रदर्शन लागले होते. त्यादिवशी मला प्रथमच कळले की हाडामासाची माणसे सुद्धा इतके पैसे मोजून घेतलेले कपडे घालतात. आजवर हे कपडे फक्त पुतळ्यांनांच घालायसाठी असतात असाच माझा समज होता. इंग्रजीची तर गंगा वाहत होती ‘येस, शुअर, नो प्रॉब्लेम, डन’ असेच शब्द सारखे कानावर पडत होते. बंगलोरमधे इंग्रजी असने यात नवल असे काही नव्हते, कुणी गंमतीने मागे म्हणाले होते की बंगलोरची प्रथम भाषाच इंग्रजी आहे, तिथला रिक्षावाला सुद्धा तुम्ही जरी कानडीत बोलला तरी तो तुम्हाला इंग्रजीतच उत्तर देतो.  पुढे वाचा

लिखाण

“आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू … लिखाण वाचन सुरू ठेवा

Rate this: