कुणी जाल का

काही वर्षापूर्वीचे गोष्ट आहे त्यावेळेला डीजीटल कॅमेरे नुकतेच आले होते. काढलेला फोटो लगेच दिसणे ह्या गोष्टीचे फार अप्रूप होते. त्यावेळेला पर्यटन स्थळी डिजीटल कॅमेरा गळ्यात घालून फिरणे हे प्रतिष्ठेचे लक्षण होते. मी काही कामानिमित्त गोव्याला गेलो होतो, एकटाच होतो. काम झाल्यावर पणजी जवळील मिरामार बीचवर बसलो होतो. सुरेख संध्याकाळ होती, सूर्य मावळत होता, तो तांबडा … Continue reading कुणी जाल का

फणा

मिश्किलीच्या स्पर्धेतील विजेती विडंबन कविता (कवि कुसुमाग्रज उर्फ तात्यासाहेब शिरवाडकर यांची माफी मागून) ओळखलत का सर मला, दारात आला कोणी केस नव्हते विस्कटलेले, डोळ्यात नव्हते पाणी क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला छाती काढून, ‘इनकम टॅक्सची धाड आली, गेली मान वाढवून’ कैदाशिनीसारखी नुसती कागदी घोडी नाचली, सारी खाती गोठविली, स्वीस बँक मात्र वाचली. कॅश वेचली, लॉकर … Continue reading फणा

…. इथले संपत नाही

(कवी ग्रेस आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांची जाहीर माफी मागून.) थोडासा वेगळा प्रयत्न आहे, मूळ कवितेतील कमीत कमी शब्द बदलून विडंबन साधण्याचा प्रयत्न केलाय. मूळ कवितेत ५४ शब्द होते. एकूण शब्दसंख्या तशीच ५४ ठेवीत त्यातले फक्त १२ शब्द बदलून उर्वरीत ४२ शब्द तसेच ठेवून विडंबन साधण्याचा प्रयत्न केलाय. कितपत जमलेय ते सांगा. चणे इथले संपत नाही, … Continue reading …. इथले संपत नाही

सिट

(कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांची माफी मागून) खचाखच भरलेली बस स्टॉपवर उभी राहून पहा बघ माझी आठवण येते का? हात लांबव, पावलांवर झेलून घे बुटांचे मार इवलस दुःख पिउन टाक बघ माझी आठवण येते का? रीक्षाने उडणारा धुळीचा लोट अंगावर घे, पदर सांभाळ, हात दाखव इतक करुनही तो नाहीच थांबला तर चालत जा, स्टेशनवर … Continue reading सिट

मग कधीतरी

मग कधीतरी ..... त्या समुद्राला उधाण असेल, त्या वाऱ्यालाही वेग असेल, त्या ढगातही गडगडाट असेल त्या विजेचाही कडकडाट असेल मग काय, तो थोडीच थांबनार, तो कोसळणारच , धो धो कोसळनार चंद्राची सुट्टी असेल, बसची हलगर्जी असेल, दिव्यांचीही मर्जी असेल त्या अंधारलेल्या पावसाळी, तू आणि मी माझ्यापुढे तू तुझ्यामागे मी, भेदरलेली तू, भांबावलेला मी तो जीवघेणा … Continue reading मग कधीतरी

आवाज

इंजिनियरींगच्या फर्स्ट इयरला असताना शनिवारी गणिताचा पिरेड राहायचा आणि शनिवारी तो एकच पिरेड असायचा. असे असूनही बहुतेक सारा वर्ग त्या पिरेडला हजर राहायचा कारण तो पिरेड म्हणजे दीड तास निखळ मनोरंजन होते. कधी विकएंडला घरी जायचे असले तर आम्ही शनिवारी तो पिरेड करुन घरी जायचो.  सरांचा वर्गावर नसलेला कंट्रोल आणि मुलांचा स्वतःवर नसलेला कंट्रोल या … Continue reading आवाज

सोबत

"शी!!! देवदास किती बोर. नको जा तुम्ही, मी  नाही येनार." "ए चल ना काय उगाच नखरे करतेस. आम्ही तुझ्यासोबत तो साइन्स बघितला होताच ना, तो काय कमी बोर होता. आम्हाला एक वाक्य कळले नाही." "तरी पण देवदास, तो शाहरुख. नको रे बाबा. अरे खरच रे मला हिंदी पिक्चर फार बोर होतात." "ए च्यायला, तू जरा जास्तच … Continue reading सोबत

काय वाट्टेल ते, वाट्टेल तिथे, वाट्टेल तेंव्हा, वाट्टेल तसे लिहीतो आणि मीच म्हणतो आवडत नाही मला आवडत नाही मला, मीच लिहीलेल्या कविता वाचायला आवडत नाही मला, मीच लिहीलेला लेख चाळायला आवडत नाही मला, माझा मी आणि पुन्हा मीच विद्रोही कवि फाडून टाकील साऱ्या जगाला तुम्ही कोण मला अडवनारे घालीन लाथ पेकाटात याल जर मला आडवे … Continue reading