दिवाळीच्या शुभेच्छा

शुभ दिपावली

नमस्कार मंडळी
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, तुम्हा सर्वांना ही दिवाळी आनंदाची, सुख समाधानाची, भरभराटीची जावो ही शुभेच्छा. गेल्या वर्षीपर्यंत मी अंधार, प्रकाश, रात्र, दिवस या केवळ साहित्यिक कल्पना आहेत असेच समजत होतो. काही प्रमाणात कुणाच्या वैयक्तीक आयुष्यात दिवस रात्रीचा खेळ होऊ शकतो परंतु संपूर्ण मानवजाती एकाच वेळेला अंधार प्रकाशाच्या साखळीतून जाऊ शकते हा विचार कधीच आला नव्हता. यावर्षी करोनामुळे या संकल्पनांना वेगळाच अर्थ प्राप्त झाला. त्या संदर्भात यंदाच्या दिवाळीला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जन्माला आलेल्या आमच्या पिढीने जागतिक संकट, अंधकारामयी जग कधी अनुभवले नव्हते. दुःखाच्या, अंधाराच्या साऱ्या संकल्पना वैयक्तीक होत्या. २०२० सालात करोनामुळे या पिढीला या साऱ्याचा अनुभव आला. महायु्द्धाच्या काळात भयंकर शांततेत वाजणारे सायरन, प्लेगाच्या काळात गावाबाहेरील वस्ती या अशा भयावह परिस्थितीची त्यातील भयावहतेची पुसटशी कल्पना आजच्या पिढीला करोनामुळे झाली. अशात चीनने उगाचच कुरापती केल्या देशावर युद्धाचे सावट निर्माण झाले. करोनासाठी कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था कोलमडली, कित्येक बेरोजगार झाले. पर्यटन संबंधित क्षेत्रातील कपन्यांना अजूनही आशेचा किरण दिसत नाही आहे. पाऊस आणि पूर सुद्धा न भूतो न भविष्यती या स्वरुपाचा झाला. या साऱ्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळीला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. कुठेतरी एक पणती पेटावी त्या पणत्यांची आरास व्हावी, त्याची रोषणाई व्हावी या दिवाळीने सर्वांना आनंद द्यावा. पुढे एक दोन महिन्यात येणारी करोनाची लस, भारताचा कमी होउन तीन ते चार टक्क्यावर स्थिरावलेला करोनाचा(Test positivity) दर, सणासुदीच्या निमित्ताने दुकानात वाढलेली गर्दी, आठव्या बोलणीनंतर भारत आणि चीन मधे समझोत्याचे आशादायी प्रपोझल या साऱ्या दूर अंधाराच्या पोकळीनंतर दिसणाऱ्या लहाण पणत्या आहेत. या आणि अशाच पणत्यांची आरास सर्वांच्या अंगणी उजळू दे, या दिव्यांच्या रोषनाईने जीवन उजळून निघू दे. सर्वांच्या आयुष्यातील अंधार संपून परत एकदा प्रकाशाची किरणे दिसू दे. याच शुभेच्छा !!

यंदा मिसळपाव दिवाळी अंकासाठी लिहिलेल्या दोन कथा

गंधासक्ती

पांढरी रेघ येताना

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s