ढेरपोट्याचा डाव खल्लास…

Dherpot
चित्रे: नितीन बंगाळे

हवा हि नाकात गेली कि जितकी चांगली तितकीच ती डोक्यात गेली की वाइट. डोक्यात हवा ही जातेच. असे डोक्यात हवा गेलेले नमुने दिसतातच. चार लोक जोकला काय हसले तर तो स्वतःला पुल समजायला लागतो. एखाद्या कार्यक्रमात एखादी कविता काय वाचली तर लगेच गुलजारच्या काव्यातली भाव्यात्मकता हल्ली कमी होत आहे काय? अशी चर्चा करायला लागतो. तिसऱ्या गल्लीतल्या चौथ्या चौकातल्या गणेशोत्सवाच्या नाटकात अमिताभचे डॉयलॉग काय वाचले तर लगेच आपल्याच घरुन ऐश्वर्याला म्हणायला लागतो ‘सूनबाई सतत नाकातून आवाज नाही काढायचा.’  ही अशी हवा खास डोक्यात जायलाच असते असेच वाटते. अशीच डोक्यात हवा गेलेला हा गोम्स, खऱतर छान नारायण गोमासे पण नाही मी नॅरी गोम्स म्हणे. फक्त हातात पाइप धरला आणि अंगावर कोट चढवला म्हणून स्वतःला गुप्तहेर समजनारे हे ध्यान. गुप्तहेरीशी काडीचाही संबंध नाही. ज्यांना लग्नात कोण बुट लपवतो ते सांगता येत नाही चालले गुप्तहेर बनायला. तेंव्हा फजिती ही होणारच. अशाच फजितीची मी एक कथा लिहिली होती. डॉ. वाटमारे आणि ढेरपोट गोम्स.   मी लिहिणारा कोण.  मी फक्त कथेत बदल केले. लिहून मी विसरुन गेलो हो. तसेही का लक्षात ठेवायचे अशा ढेरपोट्यांना.

महाराष्ट्र मंडळ नैरोबी यांनी जेंव्हा त्यांच्या मंडळासाठी नाटक लिहून द्या अशी विनंती केली तेंव्हा तो ढेरपोट्या आठवला. मूळ कथेत काही बदल करुन नाटिका लिहिली. मूळ कथेत नसनार पानवाला हे पात्र त्यात टाकल. कथा फक्त पानवाल्याच्या टपरीवर आणि त्याच्या ऑफिसात घडते असे दाखविले. माझ्या तिरकस, खोचक डॉक्टरला पारशी करुन त्याला दिग्दर्शकाने नवीन रुप दिले. त्याच्या तिरकसपणाला धार आणली. सुटबुटवाला, सुरेखा आणि रिक्षावाला या पात्रांमधे आणखीन रंगत आली. या साऱ्यातून काय साधले तर महाराष्ट्रापासून दूर असनारे आपले मराठी बांधव जे इतक्या दूर असूनही मराठी संस्कृती, भाषा जपण्याचा प्रयत्न करतात त्यांचे निखळ मनोरंजन. या मनोरंजनात खारीचा वाटा उचलला याचे समाधान.

नैरोबीस्थित श्री. नितीन बंगाळे यांनी हे सारे त्यांच्या व्यंगचित्रातून मस्त रेखाटले. मुळात कॅरीकेचर सारखी असनारी ही पात्रे त्यांच्या व्यंगचित्रातून बघताना आणखीन मजा आली. हि चित्रे श्री नितीन बंगाळे यांची परवानगी घेउनच इथे देण्यात आली आहे.

doctor.jpeg
चित्रे: नितीन बंगाळे
Rikshawala
चित्रे: नितीन बंगाळे
Suitbootwala
सुटबुटवाला, चित्रे: नितीन बंगाळे
Rajababu
राजे, चित्रे: नितीन बंगाळे
Panwala
पानवाला, चित्रे: नितीन बंगाळे
Pari
मी परी, मी अप्सरा, मी सुंदरा, चित्रे: नितीन बंगाळे
Vachan
चित्रे: नितीन बंगाळे
LOL
हसा लेकोहो, चित्रे: नितीन बंगाळे
Vyangchitrakar
चित्रे: नितीन बंगाळे

या धमाकेदार प्रयोगाची युट्युब लिंक